श्वास मैत्रीतला...
श्वास मैत्रीतला...
2 mins
11.7K
सुगंध शब्दातला
मैत्रीच्या नात्यात
रे बहरला
उत्सवात
सजला
क्षण
तो ।।१।।
गंध दरवळला
अनोख्या धुंदीचा
गवसायला
प्रेमरंग
बनला
साथी
हो ।।२।।
संवादाचा मांडला
खेळ सोबतीचा
मनी हसला
अनेकदा
रुसला
बंध
हा ।।३।।
रंग सुवासातला
नकळत आता
काळजातला
वचनात
गुंफला
श्वास
हा ।।४।।
मैत्री प्रेम भेटले
सर्वांकडूनच
गहिवरले
माझे मन
विरले
नाही
ते ।। ५।।
कसे घेणार नाव
एका बंधनाचे
जडला भाव
विश्वासाचा
अभाव
नाही
रे ।।६।।
आनंदित मनाला
हर्षित बहर
स्पर्श तनाला
भावनांच्या
फुलाला
जपू
रे ।।७।।
