शुभ दिपावली
शुभ दिपावली
लक्ष दीप हे उजळती ज्योती
तुळस देखणी अंगणी उभी
दारी शोभे ती सरस रांगोळी
आकाश कंदील झळकतो नभी
वसू बारस गाय वासरु पूजन
गोमातेच्या उदरी तेहतीस कोटी देव दर्शन
धनत्रयोदशी धन्वंन्तरी कुबेर पूजन
आली धाकली दिवाळी आनंदाचे घेऊन क्षण
ब्रम्हसमयी अभंग्यस्नान आरोग्या लाभे धन
नरक चतुर्दशी हा विजयी सण
शेतपीक येवून भरास,आले घरात
सोन पावली आली दिवाळी झाले आनंदी मन
लक्ष्मी पूजनाचा विशेष थाट
गणपती, लक्ष्मी, सरस्वती पूजा साज
नैवेद्याला खमंग फराळाचे ताट
लाडू, करंजी, चिवडा, चकलीचा ताज
उटण्याचा स्पर्श सुगंधी प्रेम वाढवी
पतीपत्नी नात्याचा मधुर पाडवा
अवीट स्नेहाचा शीतल चांदवा
भावा बहिणीचा भाऊबीजेला वाढे गोडवा
