शुभ अशुभ
शुभ अशुभ
1 min
332
अमावस्या आहे म्हणतात अशुभ
दिवाळीचे लक्ष्मीपूजन तर असते अमावस्येलाच
मांजर आडवी जाणे आहे म्हणतात अशुभ
लक्ष्मीही मानतात मांजरीलाच
घुबड दिसणे आहे म्हणतात अशुभ
परदेशात तर शुभ मानतात घूबडेलाच
कावळा स्वप्नात येणे आहे म्हणतात अशुभ
पिंडदानाचा घास देतात कावळ्यालाच
खरेच असतं काहो हे शुभ अशुभ
प्रश्न नेहमी पडतो काय खोटे काय खऱ्याचाच
श्रद्धा म्हणावे ह्याला की अंधश्रद्धा
माणूस पारखा झाला श्रद्धेलाच
