शरणांगता!!
शरणांगता!!
1 min
204
पंढरीच्या राया जागा दे मजशी
तुझ्या चरणाशी अखंडित!!१!!
रामकृष्ण हरि येऊ दे मुखात
नाम सर्व गत रात्रं दिन!!२!!
एकविध भाव दुजा नको ठाव
पांडुरंग नाव भव सारं!!३!!
संतदास म्हणे होऊनी उदास
तुझ्या चरणास न सोडी मी !!४!!
