शृंगार
शृंगार
1 min
394
काय लिहू तुला शब्दातून आता
भिजता प्रेमात शब्द ओंथबुनी येतात..!
तू व्यापता विश्व माझे हे
मी रंगुनी गेले इंद्रधनुवाणी..!
गंध तुझा मला माझ्यात भेटे
मी उमलून येता रातराणी वाणी..!
तू हवेसम मला स्पर्शुनी जाता
रंग प्रेमाचे जणू आकाशाला भेटता..!
प्रित तुझी ह्दयात खोलवर रुजलेली
तुझ्या सहवासात मी शृंगाराने सदैव नटलेली..!