श्रमाचे महत्त्व
श्रमाचे महत्त्व
1 min
448
श्रमाविन नाही | फलित काहीच||
श्रम करावेच |लागणार ||1||
मिळाले जरीही |आयते काहीच||
किंमत शून्यच | त्याची आहे ||2||
श्रम केल्यानेच |फळ मिळणार||
तेच तारणार |आपल्यास ||3||
कष्टाची भाकरी |गोडी लागे त्याची||
त्यापुढे पेढ्याची|चव नाही ||4||
शेतामंधी कसा |कुणबी राबतो||
घास तो मिळतो | सर्वांनाच ||5||
शरीर निरोगी |मन आनंदीत||
मुख प्रफ्फुलित |कामानेच ||6||