STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

4  

Dilip Yashwant Jane

Others

श्रम

श्रम

1 min
323

सोड आळस मानवा

किती तुजला सांगावे

पूजा करून श्रमाची

धन आरोग्य लाभावे


असा कसा रे माणूस

विसरला तू श्रमाला

वस्तू चैनिच्या भोगून

निमंत्रण आजाराला


नको बाळगूस लाज

श्रम आणिक कष्टाची

होई प्रगती सारीच

घरदार संसाराची


घाम कायेतून निघे

होई रोमरोमा हर्ष

घामेजल्या देहा बघ

वारा करीतो रे स्पर्श


गार झुळूक वाऱ्याची

तन मना सुखावते

कसे सांगू रे तुजला

शांती चित्तास लाभते


Rate this content
Log in