STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

2.0  

Sanjay Raghunath Sonawane

Others

श्रीराम वचन

श्रीराम वचन

1 min
908


श्रीराम नवमी सण भारताचा

मानवी संस्कृती आणि आदराचा

साजरा व्हावा गुण्यागोविंदाने

सर्व समावेशक जातीधर्माचा


पावित्र्य राखावे मंदिराचे

गोरगरीबांस व्हावे आश्रयस्थान

मुखी जपावे रामनाम

शुद्ध होईल अंतरमन


सर्व मानवजातीस खुले आहे

भारतीय एकात्मता त्यातून दिसावी

श्रीराम प्रभूंचे दर्शन घ्यावे

विश्व बंधुत्व भावना नांदावी


अध्यात्म्याची जोड असावी

अध्यात्मात जीवन जगावे

शांतीचा मार्ग स्विकारावा

मानवाने सत्य कर्म करावे


प्रेमभावना शिकवण श्रीरामाची

गुरुआदर आचरण श्रीरामाचे

शिष्यानी केले प्राणार्पण

वचन राखीले प्रभूरामचंद्रांचे


नको दंगल, धर्मवाद

हृदयात राम दिसावा

कर्म करावे मानवासाठी

नको घडो कुठे रक्तपात


माणूस म्हणून शिकवण भारताची

सुखशांती नांदावी भारत देशात

आदर्श दिसावा साऱ्या विश्वात

सहिष्णुता आचरावी भारत देशात


Rate this content
Log in