श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
1 min
311
रामायणात तूच श्री राम द्वापारयुगात तूच श्री हरी
भक्तांसाठी स्वामीराया अवतरला भूवरी
तूच कैलासाधिपती तूच विष्णुलोकाधिपती
तूच ब्रह्मांडाधिपती
तुझ्या चरण स्पर्शाने पावन झाली ही धरती
तुझा सहवास लाभला भक्ता अक्कलकोटी
तू असता सोबती भिती कशाची
तू असता पाठीशी चिंता कशाची
तुझ्या स्मरणाने संकटं जाते दूर
तुझ्या नामात शक्ती आहे अपार
मनीचे भाव तुला न सांगता कळले सारे
जे हवे ते न मागता तू दिले सारे
माय तूच अन् बाप ही तूच
या जगात सर्व काही तूच
संकटात लढण्या बळ देशी तूच
गरज पडता लेकरा धाऊन येशी तूच
