श्री संत गोरा कुंभार
श्री संत गोरा कुंभार
महाराष्ट्रातील एक वारकरी
संप्रदायातील थोर संत
नाव त्यांचे गोरा कुंभार
होते ते विठ्ठलाचे भक्त ||
प्रतिकूल त्या परिस्थितीत
गोरोबांचा जन्म झाला
चमत्कार आहे असे म्हणती
गोरोबांना गोरीतून काढला ||
विठ्ठलाचे करे नामस्मरण
असे गोरोबांचे महान जीवन
पांडुरंगाच्या नामस्मरणात
देहाचे भान हरपून तल्लीन ||
मन गुंतले नामस्मरणात
तुडविले आपले बाळ
देह मिसळला मृतकेत
घेऊन गेला बाळाला काळ ||
तोडिले आपले दोन्ही हात
झाले संसारातून विरक्त
आत्मीयता, श्रद्धा असे
परमेश्वराचे होते खरे भक्त ||
परमभक्त गोरोबांच्या घरी
सेवेसाठी विठ्ठल-रुक्मिणी आले
गोरोबांच्या भक्तीवर प्रसन्न झाले
नगरीत पांडुरंगा राहून गेले ||
