श्री जेष्ठा गौरी आवाहन
श्री जेष्ठा गौरी आवाहन
1 min
405
भाद्रपद महिन्यात
गौरीचेही आगमन
नक्षत्रही अनुराधा
असे गौराईचा मान ||
घरी वाजत गाजत
येई गौराई माहेरी
सोनियाच्या पावलांनी
आवाहन करी गौरी ||
दूध पाण्याने धुऊन
लक्ष्मीचेही दिसे ठसे
गौराईच्या येण्यानेही
शांती घरातही दिसे ||
नववारी नेसुनीही
चुडा हिरवा घालून
साज शृंगार करून
नथ नाकात घालून ||
सुवासनी पुजतात
खना नारळाची ओटी
भरूनच वाने देती
कुंकू हळदीची वाटी ||
सजवून नटवून
शोभतात लक्ष्मी घरी
तिसऱ्याच दिनी बाई
जाती सोडूनी ही गौरी ||
