STORYMIRROR

Varsha Pannase

Others

3  

Varsha Pannase

Others

श्री.गणेश विसर्जन 🌺

श्री.गणेश विसर्जन 🌺

1 min
302

गिरी चंद्र नंदना श्री गणेशा

आला ठुमकत ठुमकत

वाजे ढोल ताशा

गिरी चंद्र नंदना श्री गणेशा......

चराचरी तुच सृष्टी चा नायक

आवडे मोदक संगे नाचे मुषक

दे आशिष विघ्नविनाशा

शंभु पार्वती नंदना श्री गणेशा.......

करी भक्ता घरी वारी

राही भक्तांच्या उदरी

घर मानसरोवर गणाधिशा

येती पार्वती नंदन श्री गणेशा.....

गुंतविले मोह पाशा

लाविली रे आशा

गज अवनेशा

तुझीच लिलया श्री गणेशा......

 

आली अनंत चतुर्दशी

खुप बोलावे तुझ्याशी

गुंज मनीचे विघ्नेशा

तु सुक्ष्मरुप दु:खहर्ता श्री गणेशा.......

मन गुंतले अनंता

पाही वाट माता

कशी थांबऊ रुद्रांशा

हूरहूर चित्ता लागली गणेशा.......

लाविला रे लळा

लावला जिव्हाळा

रुणझुण काना भास रिध्देशा

दिसे राञंदीन मुखकमल श्री गणेशा....

गिरी चंद्र नंदना श्री गणेशा.............


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ