STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Others

4  

Mahesh Raikhelkar

Others

श्रद्धास्थान

श्रद्धास्थान

1 min
2.4K

गुरुविणा कोण दाखवील वाट

गुरुविणा कशी होईल पहाट !


गुरु असे दिशादर्शक

जीवनाचा एक मार्गदर्शक !


गुरु करी चांगले संस्कार

दगडास देई मूर्तीचा आकार !


गुरुविना कोण देईल आधार

शिष्याचा वाहील कोण भार !


गुरुविना कोण घेईल परीक्षा

चुकल्यास कोण देईल शिक्षा !


शिष्याच्या यशात गुरुचे यश

उभा खंबीर जरी आले अपयश !


गुरुविना कसा ज्ञानसागर पार

शिष्यास दाखवेल कोण पैलतीर !


गुरुचा वर्णावा किती महिमा

परब्रम्हांची त्यास उपमा !


गुरु असे माझे श्रद्धास्थान

सदाच मी त्यांच्यासमोर लीन !


गुरुचा वाढतो सन्मान

पाहून शिष्याची यशाची कमान !

पाहून शिष्याची यशाची कमान!!


Rate this content
Log in