STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Others

4  

Dr.ANIL SANGLE

Others

*श्रावणी सोहळा*

*श्रावणी सोहळा*

1 min
436

'नारळी झुलती धरणी झेलती नेसली हिरवा शालू,

"सागरा भरती गायन करती मयुर लागले डोलू"


'नाकवा रातीला बोटीच्या साथीला तुफान दर्याची लाट,

"संकट सोसुन मृत्युला पोसुन पोहूनी किनारा गाठ"


'मल्हार सरीत मेघाना भरीत चातक पितोया पाणी,

"स्वरात ओळीनं मंजूळ गळ्यानं कोकीळ गातोया गाणी"


'पोशिंदा जगाचा काळीज वाघाचा कुणबी शेतात नांदे,

"दर्याचा नाकवा नाहीच थकवा जाळीला खोलात बांधे"


'पोटाला भाकरी जीवाला चाकरी दोघच जगाला तारी,

"जपून संस्कृती करून प्रगती जोडीला मर्दाची नारी"


'राबून योजना करून गर्जना भेटूद्या उचीत भाव,

"बळीची सांगड कोळ्याची धांगड सुखानं फूलूद्या गाव"


'कोळ्याचं म्हावरं बघतो डिव्हर खायाला धजल्या घारी,

"सागर धरणी बळीची पेरणी शिवार सजलं दारी"


'नौरंगी शृंगार विजांचा अंगार धुंदीत त्रिलोकी गाजे,

"आंब्याच्या वनात सागरी धनात श्रावणी सोहळा सजे"


'प्रतिभा फुलते सौंदर्य खुलते धरणी मेघाला पीत,

"बळीचं लेकरू कोळ्याचं पाखरू अनिल लिहीतो गीत"


Rate this content
Log in