श्रावणी शृंगार
श्रावणी शृंगार

1 min

63
स्वप्न हे पाहता लोचने
श्रावणात फुलले
निसर्गाशी जमले नाते
सत्यात उतरले
चाफ्याचा तो स्पर्श होताच
शब्द काही फुटेना
या दुनियेत कधी रमलो
माझे मला कळेना
नृप आगळे दिव्यत्वाचे
श्रावणात लाजले
येणारे फुलांचे ताटवे
दाहीदिशांना पहुडले
दिवसाची सांज होताच
फुलपाखरू दिसे
आकाशाकडे पाहताच
भासे गोंडस ससे
पानोपानी बूँद बघता
मन माझे झुरले
श्रावणातल्या त्या थेंबाने
डोळे माझे दिपले
श्रावणी शृंगार सजता
आकाश वेडे झाले
नभी पक्षी दिसता हास्य
नवे उलगडले