श्रावणाचा मंद वारा
श्रावणाचा मंद वारा
1 min
2.4K
श्रावणाचा मंद वारा वाहतो
घाव मी रे वादळाचा साहतो
प्रीत माझ्या काळजाची आटली
द्वेष सारा हा तळाचा वाहतो
शीतकाया पांघरुनी बैसला
डाव वर्मी कातळाचा दाहतो
माय माझी देव आहे जीवनी
शब्दशेला पातळाचा राहतो
सोसलेले काय सांगू घाव हे
नाव माझे या तळाला पाहतो
वृत्त- मेनका
लगावली- गालगागा गालगागा गालगा
