STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

श्रावण

श्रावण

1 min
166

श्रावण रिमझिमतोय

तनातआणि मनामनात

श्रावण धुंद सुंदर

नवोदितेच्या प्रणयासारखा

श्रावण मधाळ

षोडशेच्या हास्या सारखा

श्रावण ओढाळ

यक्ष गानातल्या विरहिणी सारखा

श्रावण खट्याळ

पाळण्यातल्या तान्हुल्यासारखा

श्रावण चंदेरी श्रावण सोनेरी

श्रावणाची महती

श्रावणाच जाणे

त्याचे रिमझिमणे त्याचे बरसणे

जणू शृंगारलेल्या तरुणीच्या अंगावर

अत्तराचा शिडकावा

श्रावण बहरावा असा च

तनामनात जीवनात



Rate this content
Log in