STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

2  

SWATI WAKTE

Others

श्रावण

श्रावण

1 min
535

सणासुदीची घेऊनि उधळण

आला हा हसरा श्रावण


चला पुजू या नागपंचमी

सर्प सांगती शत्रू नाही मित्र आम्ही


महान सण हा रक्षाबंधन

दृढ होती बहीण भावाचे पवित्र बंधन


सोमवारी पुजू या महादेव

नतमस्तक होऊनि म्हणू सुखी ठेव


सौभाग्यवती पुजती मंगळागौर

खेळ खेळुनि पारंपरिक थोर


जन्माष्टमीचा सण महान

दहीहंडीला येती उधान


असा हा गोजिरा श्रावण

कर्तव्य आणि नात्याची देतो आठवण


परंपरेचे सर्व मिळुनी करू या जतन

अमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण


Rate this content
Log in