श्रावण सरी
श्रावण सरी
1 min
445
श्रावण सर सरी
घरी आणि दारी
फुल फुलई हसरी
बघ ढग सोनेरी आला
श्रावण आला,श्रावण आला ।
हिरवळ मखमली
गर्द दवात ओली
पान फुले डवरली
नभी इंद्रधनुही उगवला
श्रावण आला, श्रावण आला।
नभी शुभ्र बगळे
मोहविती सगळे
रूप निसर्गाचे आगळे
मोहवी थेंब थेंबाला
श्रावण आला,श्रावण आला ।
श्रावण सरी वर सरी
वाजवी बासरी
श्रीकृष्ण मुरारी
गोकुळीं गोपाळ काला
श्रावण आला,श्रावण आला ।
अंगणी श्रावण सरी
अखंड अवनीवरी
ढग धुक्याच्या चादरी
तन मनात मोर फुलला
श्रावण आला,श्रावण आला।
