STORYMIRROR

Nutan Pattil

Others

4  

Nutan Pattil

Others

श्रावण महिमा

श्रावण महिमा

1 min
257

आला श्रावण महिना

करू मंगळागौरीचे पूजन!!

करू साजशृंगार

पूजा करू नटूनथटून!!


झिम्मा फुगडी चा खेळ

आला सण नागपंचमीचा!!

मेहंदी लावून हाताला

खेळ खेळू आनंदाचा!!


आला श्रावण सोमवार

पूजा करु महादेवाची!!

बेल वाहू पिंडीवर

भक्ती करू भोलेनाथाची!!


बहिण ओवाळते भाऊ राया

सण हा पवित्र बंधनाचा!!

बांधू रेशमी धागा

हातावर रक्षाबंधनाचा!!


आली श्री कृष्ण जन्माष्टमी 

झाला सर्वांचा मेळावा!!

आनंद साजरा करू

दहीहंडी फोडावया!!


स्वातंत्र्य दिन साजरा करू

आला श्रावणात!!

मिळाले स्वातंत्र्य

आठवण ठेवू आनंदात!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन