श्रावण मास
श्रावण मास
1 min
308
श्रावण मास आला
धुंद सरींनी बरसला
सणांच्या किती तरी रंगाना
तो घेऊन आला
भावा बहिणेचे पवित्र नाते
एका राखीने वरीसभर बांधते
रक्षा करण्याचे वचन ते
बहिण भावाकडून घेते
सोमवार श्रावणाचे
वातावरण उत्साहाचे
पूजन ते महादेवाचे
करी प्रसन्न कोपरे मनाचे
उपवास तपास
तरीही उल्हास
फराळाचा घास
करी प्रसन्न दैवी भास
देशाचे स्वतंत्र
मिळाले सोडून पारतंत्र्य
एकजूटीचा मंत्र
पसरला सर्वत्र
