सहप्रवासी
सहप्रवासी
प्रकाशमान करुयात
जीवनाच्या या वाटा!
राग, द्वेष, अहंपणास
लोभासही देऊ फाटा!!१
८४ लक्ष फेऱ्यांतील
मनुष्य जन्म अनमोल!
विचार, बुद्धिहिन जीणं
ठरतच की मग फोल!!२
सारेच आहे भारतीय
एकाच माळेचे मणी!
शत्रूने चढाई करताच
उभेच ठाकू या रणी!!३
प्रत्येकातच दडलाय
एकतरी चांगला गुण!
माणुसकी हाच खरा धर्म
फेडूयात मानवतेचे ऋण!!४
व्यथा नि विवंचनांची
नका करु कधी तमा!
कशाला ठेवायचा हिशोब
किती खर्चले किती जमा?!५
जाती, धर्म वा पंथामध्ये
आणू नका रे भेदाभेद!
अन्याय्य रूढी परंपरांना
किमान देऊयात छेद!!६
सुखाच्या पाठी दु:ख
नियतीचा रे खेळ!
गुरफटून त्यांत जाता
जाईल फुकटचा वेळ!!७
निसटून जाता आयुष्य
वाद करु शकाल कुणाशी!
जीवनाच्या या वाटेवरचे
आपणच तर सहप्रवासी!!८
