शोधले तुला
शोधले तुला
1 min
245
झाडावरती होती काल
कळी ती लाल लाल
उत्सुकता तिला पाहण्याची
तयारी तिची आणखी खुलण्याची
प्रभात समयी गेले पाहायला
तिथे नव्हतीच ती मुळी
इकडे तिकडे शोधले तिला
निराश होऊन आले घरी
तरी राहिली ती मनी
शेजारी काकूंना भेटली जेव्हा
टेबलावर दिसली गुलदस्त्यात मला
न रहावता घेतले तिला
रगावलेच जरा
किती ठिकाणी शोधले तुला
आणि तु मात्र गुलदस्त्यात दिसलीस मला
