शोध
शोध
1 min
313
कसला शोध घेतेय
काय राहिलाय आता
आयुष्याचा शोध घेता घेता
काय लागलंय हाती
अनुभव घेता घेता
शहाणपण अंगी आलं
तडफड जीवाची होत होती
पण हाती काही लग्लच नाही
आधारासाठी हात मागितला
तर मार्गात अडचणीचे काटे आडवे आले
मार्ग शोधत पुढे गेले
पण जगणे माझे महाग झाले
आयुष्य माझे संघर्षमय झाले
सदैव जिंकायचे स्वप्न पाहिले
ज्यांच्यासाठी झगडले
तेच मार्गी उताणे पडले
शेवटी काय.......
आयुष्याचा शोध घेता घेता
हाती काही लागले नाही
