STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

शोध तिच्या अस्तित्वाचा

शोध तिच्या अस्तित्वाचा

1 min
475

कुठे आहेस तू विचार केलास कधी?

शिक्षित असून अशिक्षितासारखी वागतेस

स्वतःला दुसऱ्यांच्या गुंत्यात अडकवून घेतेस

क्षणोक्षणी मनात कुढत बसतेस


बघितलंस कधी स्वतःकडे वळून

मुलांना घडवतेस कुंभाराप्रमाणे

विचार केलास कधी?

मुलांप्रमाणे जगाला घडवू शकतेस


कधी शोधलंस स्वतःचं अस्तित्व

तुझ्या ममतेने तुझ्या गुणांनी

तू तुझं अस्तित्व शोधू शकतेस

दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगू शकतेस


कधी झालीय स्वतःची जाणीव तुला?

निरखून बघ स्वतःतील गुणदोष

नाही ना विसरलीस स्वतःला

ओळख पटेल बघ तुझीच तुला


Rate this content
Log in