STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

शंकरस्तुती

शंकरस्तुती

1 min
220

नीलरंगी शंभो शंकरा

सांब सदाशिव शंकरा 

आवड तुला बेलाची

बेलाच्या पानांची.....


गला तुझ्या रूद्राक्ष माळा

लाविले भस्म तू कपाळा

त्रिशुल डमरू आहे हाती

शंकरा सोबत पार्वती....


जटेमधे झुळझुळू वाहे गंगा

मस्तकावर शोभे चांदोबा

भोलेनाथ आले तुझ्या दारी

चूकभूल घाला हो तुमच्या पदरी...


करूणाकारा हो शिवशंकरा 

समजून घ्यावे या पामरा

पाठी उभे राहूनी हो

भक्ता आपण सामर्थ्य द्या शंकरा...


देवांच्याही देवा आपण

शिवशंकर महादेवा

मनात जपून ठेवलाय 

तुमच्या नामाचा ठेवा.....

ॐ नमः शिवाय नमः ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन