सहन किती करायचे ...?
सहन किती करायचे ...?
1 min
223
अन्याय होतो आहे फार
जुलूम नि अत्याचाराचे
तोंड किती गप्प ठेवायचे
सहन किती करायचे ..?
मुलगी नको म्हणुनी
गर्भ किती वेळा पाडायाचे
मुलांसाठी हे सर्व प्रकार
सहन किती करायचे ..?
मुलगी आली लग्नाला की
हुंड्याचा प्रश्न सोडवायचे
हुंड्यासाठी मुलींचे बळी
सहन किती करायचे ..?
लॉकडाऊन रोजगार मिळेना
किती दिवस त्रास सोसायचे
आज-उद्या करत पैश्यासाठी
सहन किती करायचे ..?
जीवनात कधी तरी मिळेल
सुख असे मनी समजायचे
रोज रोज तेच रडगाणे
सहन किती करायचे..?
