शिवसूर्य
शिवसूर्य
1 min
293
कपाळी "भगवा" टिळा
की हा उगवतीचा. "सूर्य"
"जिजाऊ" पोटी जन्मे
मराठ्यांचा "शिवसूर्य".......
धगधगता "ज्वालामुखी"
की तांडव "रूद्रावतार"
नाव तयाचे. "शिवबा"
पराक्रमी "सई" भर्तार.......
कडकडे "वीज" नभीची की
"शिवबाची" तळपती "तलवार"
कापे गनिम थरथर
ऐके "शिवाजी" नाम एकवार.......
कोसळती "जलप्रपात" की
दौडतो अश्व "कृष्णा"
"शिवबा" ठोके मांड
पाठ लागे शत्रूस "तृष्णा"....
जीव जीवा न्हावी तो "शिवा"
दुजा हुबेहूब दिसे "शिवबा"
अवाक शत्रूसैन्य "संभ्रमी"
"ससंदेह" गनिम उभा.......
