STORYMIRROR

Sandeep Dhakne

Others

4  

Sandeep Dhakne

Others

शिवराय

शिवराय

1 min
303

पहाटेच्या सुंदर किरणात

शिवनेरी झळकला होता

      शिवरायांच्या जन्माने

      सहयाद्री हसला होता ||


राजमाता जिजाऊची आज्ञा

शिकवण दिली पराक्रमाची

      रायरेश्वराच्या मंदीरात

      शपथ स्वराज्य स्थापणेची ||


तोरणागड घेतला जिंकूनी

विजयाचे तोरण बांधिले

      महाराष्ट्राच्या भुमीसाठी

      रक्त मावळ्यानी सांडीले ||


स्वराज्यावरील आक्रमण

अफझलखानाचा डाव होता

      शत्रूला पुरून उरणारा

      माझा शिवाजी राजा होता ||


पावन झाली होती खिंड

वीर बाजीप्रभूच्या रक्ताने

      दिले प्राणाचे बलिदान

      शिवरायांच्या भक्ताने ||


तानाजीचा बघून पराक्रम

कोंढाणा सुद्धा हादरला

      स्वराज्य रक्षणासाठी

      सिंह धारातीर्थी पडला ||


गनिमी काव्याची भरारी

शत्रूला पराजित करी

      शूर मराठे सरदार

      हसत मरण पत्करी ||


भगव्या रक्ताचा इतिहास

शिवरायांनी घडविला होता

      इतिहासाच्या पानापानात

      ठसा शिवरायांचा होता ||


महाराष्ट्राच्या कणाकणातून

घडविले होते स्वराज्य

      शिवाजी महाराजांचे होते

      जनतेच्या मनावर राज्य ||


सहयाद्रीच्या कडेकपारीत

गर्जना जयभवानीची

      महाराष्ट्राच्या इतिहासात

      गाथा माझ्या शिवरायांची ||



Rate this content
Log in