शिवपार्वती चे लग्न
शिवपार्वती चे लग्न
हे शंकरा करुणाकरा
त्रिनेत्रा गिरीजा वरा
शिवरात्रीचे तुझे लग्न
सोहळा मोठा अनुपम
नंदी वरती होशी स्वार
पुढे गणभैरवांचा वावर
भूते प्रेते नाच नाचती
हातामध्ये दिवट्या घेती
गळ्यामधील सर्प भूषण
पाहून घाबरली गिरजा माता
ऐसे खेटके ज्याचे वऱ्हाडी
नको वरू तू ऐशा कांता
गिरीजा प्रार्थी मातेला
शंभू हाच वर असे मला
तो तर शिव मी त्याची शक्ती
त्याचे चरणी माझी भक्ती
मी ती पूर्वीची पार्वती
दक्ष यज्ञी झाले सती
शिवा शिवाय अन्य व्यक्ती
दुजा न होईल कधी पती
भूतेप्रेते तर माझी बाळे
वरातीत खेळती लडिवाळे
मातेने मग ते मानले
शिवपार्वती चे लग्न झाले
