STORYMIRROR

Anupama TawarRokade

Others

4  

Anupama TawarRokade

Others

शिवबा

शिवबा

1 min
161

बुद्धीचा मेवा

जिजाऊंचा शिवबा

नमन शिवा


शिवाजीराजे

पराक्रमी जयाचे

स्वप्न स्वराज्ये


शूर मावळे

ज्यांचे सवंगडी

यश श्री माळे


चतुराईने

नित्य लढले शूर 

एकनिष्ठेने


आज्ञा जी श्रींची

शिरोभागी मानली

ही स्वराज्याची


सदा लढुनी

गनीमीकाव्याने हो

किल्ले जिंकुनी


सळो की पळो

त्यांनी केले यवना

स्वराज्य मिळो


रोवला झेंडा

स्वराज्यावरी रुळे

भगवा झेंडा


परस्त्री माता

जाणिली ज्यांनी सदा

शिवाजी दाता


जयकाराचा

नाद छत्रपतींचा

हा तुतारीचा


जय भवानी

जय जिजा शिवाजी

जय भवानी  


साहित्याला गुण द्या
लॉग इन