Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

5.0  

Neha Ranalkar

Others

शिवबा राजा चारित्र्यवान!

शिवबा राजा चारित्र्यवान!

1 min
288


शिवनेरी गडावर जन्म होता 

पाठी देवी 'शिवाई' |

'शिवबा' शोभे पुत्र जिला 

होते नाव तिचे 'जिजाबाई' | |१| |


घेऊन आशिर्वाद जिजाईचा

शिवबा लढाईस जाई |

शिवबा सम 'पुत्र' जिजाऊ सम

'माता' पुन्हा होणे नाही | |२| |


कल्याणच्या सुभेदाराची होती

एक लावण्यवती सून |

शिवबानं गौरवून मातेसमान

तिला दिली पाठवून | |३| |


तान्हुल्यासाठी मोठं दिव्य 

केलं एका माऊलीनं |

अशक्य 'सुळका' उतरून

गेली मोठ्या हिमतीनं | |४| |


शिवबानं तो बांधला बुरूज

'हिरकणी' नाव देऊन |

सत्कार हिरकणीचा केला

मातृप्रेमाची साक्ष ठेवून | |५| |


शिवबा गौरवी 'स्री'ला

माताभगिनी समान |

शोभे राजा मर्द मराठा

'शिवबा' खरा चारित्र्यवान | |६| |


माता भगिनींचा आज

हरघडी होतो अपमान |

त्यांच्यावरील पाहून अत्याचार

 जाते खाली मान | |७| |


भांडणात नसतांना दिली जाते

आई बहिणींवरुन शिवी नवी |

'शिवबा' नसनसांत भिनायला 

छाती व नीती मर्दाची हवी | |८| |


          


छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या चारित्र्याचा मागोवा घेण्याचा माझा एक प्रयत्न. आज ही कविता तरुणांना स्फूर्ती दायी ठरावी असा विचार करून मी लिहिलेली आहे.


Rate this content
Log in