STORYMIRROR

SUNITA DAHIBHATE

Others

4  

SUNITA DAHIBHATE

Others

*शिर्षक - श्रीकृष्ण*

*शिर्षक - श्रीकृष्ण*

1 min
162

अष्टमीच्या मध्यरात्री, देवकिच्या उदरी...

संहार करण्या दृष्टांचा, जन्म घेतला भुवरी ।। 


नंदाघरी करी बाललीला, कृष्ण मुरारी....

कान्हाच्या रंगी रंगली, गोकुळ नगरी।। 


वृदांवनी कृष्ण, वाजवत असे बासरी.....

मधुर स्वरात, रमुनी जाई गोकुळ नगरी।। 


माठ फोडुनी गोपींचा, खोड्या काढी श्रीहरी.....

श्यामल मूर्ती पाहताच, मंत्रमुग्ध होती नारी।।


गोपाळां संगे खेळे, जगाचा पालन हरी....

दही, दुध, लोणी चोरूनी, सवंगडी तृप्त करी।। 


Rate this content
Log in