शिरोमणी काव्यकावळा
शिरोमणी काव्यकावळा
1 min
263
कावळा
बावळा मनाने
चोचीने टोचतो मांसतुकडे
काळा काळा आहे तनाने.....
कावळा
चिऊताईचा दोस्त
करतो दंगामस्ती खूप
उडतो आसमंती थव्याबरोबर मस्त...
कावळा
कावकाव करतो
चिऊताईबरोबर गगनी विहरतो
आपल्या मित्रांसवे नाचतो बागडतो....
कावळा
अंगणात येतो
शाळेच्या मुलांसवे खेळतो
अंगणात सांडलेला खाऊ खातो....
