शिकवणी
शिकवणी
1 min
234
संस्काराची शिदोरी तुम्हा
देती माता पिता
तारुण्याच्या वळणावरती
शिकवती नैतिकता
आई म्हणजे छत्र मायेचे
बाबा प्रेरणास्थान
आयुष्याच्या संध्याकाळी
राखा त्यांचा मान
भुकेल्याला अन्न
तहानलेल्याला पाणी
गरीब दुःखीतां साठी
ठेवावी गोड वाणी
हीच तर होती माता-
पित्याची शिकवणी
