शिकवण आईची
शिकवण आईची
1 min
481
आई तू गिरवलेस
माझ्यात स्त्रीत्वाचे धडे
कसबीने संसारातले
कसे लढायचे लढे
मुलीच्या जातीने कसे वागावे?
नेहमी तुझी शिकवण
शिकूनही माणसांची
करावी सदा साठवण
आई तुझ्याकडे पाहून मी
शिकण्याची जिद्द धरली आहे
नोकरी करून सासरी मी
सुनेचे कर्तव्य करीत आहे
माणसातले माणूसपण
मीही जपते आहे
आई तुझ्यापासून दुरावले
तरीही आईपण जपते आहे
तुझ्या कुशीतून बाहेर पडून
आई धरली विज्ञानाची कास
पतीरायाच्या सोबत उभी राहून
मांडली संसाराची आरास
