STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

शिक्षण

शिक्षण

1 min
649

जड बुद्धीचा होतो, वाटायच झेपनार नाही.

मनाचेच समज आमच्या, मनाला विचारच खाई.


नाही पात्र यासाठी, प्रयत्न पात्रतेचा केलाच नाही.

अवाक चाट वाटायच दुसऱ्याच, आम्हाला पळण्याची झालीय घाई.



तरी कसाबसा रखडत, घरच्यांसाठी का होईना शिक्षण केल.

आवडते नाआवडते पणाचे ओझे, आमच्या मेहनतीनेच नेल.



पडलो असा एकदा, इजा झाली खूप मनाला.

आता भीती उरली नाही, कुतूहल होईल तुम्हाला.



प्रयत्ननांची पराकाष्टा मेहनतीचे नियोजन, असे काही बांधले गाठीला.

बाप माझा हसू लागलाय, वयाच्या या साठीला.



शेवटी प्रतिशोधात का होईना, शोधतच राहिलो.

अजाणते पणाने नकळत, शिक्षणाच्या विद्येचे अमृत प्यायलो.


Rate this content
Log in