शहाणी मी झाले तेव्हा
शहाणी मी झाले तेव्हा
1 min
198
परमेश्वर कसा असतो
हे माहीत नव्हत मला
शहाणी झाले जेव्हा
तेव्हा मी पाहिले तुला
दुःख काय असत
हे माहीत नव्हत मला
शहाणी झाले जेव्हा
तेव्हा मी सहन करताना पाहिलं तुला
माया काय असते
हे माहीत नव्हता मला
शहाणी झाले जेव्हा
जिवापाड माया करतांना पहिली तेव्हा
आयुष्याचा रस्ता कोणता
हे माहीत नव्हता मला
शहाणी झाले जेव्हा
तेव्हा योग्य चालण्याचा मार्ग दाखवला तेव्हा
आयुष्य काय असता
हे माहीत नव्हता मला
शहाणी होते मी जेव्हा
खडतर आयुष्य सहज रीतीने जगले तेव्हा
