शेवटी मन हे मनच असतं
शेवटी मन हे मनच असतं
1 min
390
सांजवेळी आली जवळी मन माझे हिरमुसे होई
शुष्क वाटेवरती खिन्न होई
कळत असूनही न कळल्यागत होई
या मनाला मी समजावते
मनात प्रश्न उभे असंख्य पण उत्तर मात्र सापडत नव्हते
अपेक्षांचे ओझे वाढत होते मनावर
मनाला खोटे आश्वासन देत होते
कोणा सांगू मी हे माझे अपेक्षांचे ओझे
आपल्या रुतलेल्या मनाला कळते हे सगळं
शब्द ओठी थांबले माझे
कसे कळेना मनाला माझ्या
शेवटी मन हे मनच असतं
कसं समजावू मी त्याला
कसंही असलं तरी मन हे बावरं असतं ते खुळपण असतं
