शेतकऱ्यांची मुलं
शेतकऱ्यांची मुलं
1 min
272
आम्ही शेतकऱ्यांची मुलं...
आमच्यासाठी दप्तर जणू..
प्लास्टिकची पिशवी असते
फाटक्या पुस्तकांसोबत...
फुटकी पाटी दिसते....
कोणताही ऋतू असो...
काळपट चहा दिसतो...
तडकलेल्या बशीवर....
कानतुटका कप दिसतो
बारा महिने अनवाणी पाय...
चप्पल म्हणजे आमच्याकडे श्रीमंती
पायाला लागतात चटके...
तरीही समदं गाव हिंडतो
आमच्या जीवनात मरणाची गरीबी दिसते
मात्र जगण्याची मजा खूप असते
