शेतकरी
शेतकरी

1 min

41
तोच आहे शिल्पकार कष्टकरी कामगार
निढळाच्या घामाने त्याच्या पिकत हे शिवार
घडवण्या समाजाचे मंदिर सुंदर
रूढीच्या पत्थरावर घालतो प्रहार
कणा तोची असे खरा
सकल दुनियेचा तारणहार
पण नशिबी त्याच्या दगड माती
जगणे झाले असह्य बेकार
आश्वासनाची पडे खैरात
परी मदत ना पोहोचे दारात
तरीसुद्धा तो जगतो आहे
ताठ मानेने कसतो आहे
देशा बनवण्या सुजलाम सुफलाम
जीवाचे रान करतो आहे.