STORYMIRROR

Poonam Jadhav

Others

3  

Poonam Jadhav

Others

शेतकरी एक स्वप्नशुर

शेतकरी एक स्वप्नशुर

1 min
305

लढतो आहे, झुंजतो आहे,

झट झट झटतो आहे,

कधीतरी येईल दर पिकाला,

म्हणूनच तो पेरतो आहे


कधी पडतोय दुष्काळ मोठा,

विहिरीत पाणी आटतं आहे,

डोळ्यांना आलाय पुर,

पिक मात्र जळतं आहे


सरला दुष्काळ,आशा थोडी वाढली,

पोराच शिक्षण,पोरीच लग्न,

बहाद्दराने स्वप्न किती पाहीली,

खत,बियाने, मशागत, हाती दमडी न राहीली


शेवटी स्वप्नशुरच ठरला तो,

पाहिलेली स्वप्नं महापुरात वाहीली

निसर्गाची खेळी बघायला,

नेत्यांची मात्र गर्दी झाली


करुन दौरे,काढुन फोटो,

कोण त्यांना पावणार होत,

नवीन स्वप्न रंगवण्यासाठी,

आज त्याच त्यालाच सावरायचं होतं


Rate this content
Log in