शेतकरी बाप माझा
शेतकरी बाप माझा
1 min
245
*नांगराचा फाळ धरी*
*शेतकरी बाप माझा"
*संगतीने कष्ट करी"
*बैलजोडी सर्जाराजा*
*भल्या पहाटे उठूनि,"
*जाई रोज शेतावर,*
*ऊन पावसात चाले,"
*त्याच्या कष्टाचा नांगर."
*ओला दुष्काळ पडला*
*किंवा दुष्काळ कोरडा*
*मोल घामाचे जपतो"
*ओलावती नेत्रकडा"
*गाळे घाम शेतामधी*,
*मिळे आम्हा मोबदला,"
*चीज कष्टाचे त्यांच्या,*
*घास आमुच्या पोटाला.*
*सांभाळून घरदार,*
*होई जगाचा पोशिंदा,*
*शेतकरी बाप माझा,*
*नको हिणवू मुकुंदा.*