शेती माती
शेती माती
1 min
209
कथा सांगते शेतकऱ्याची
ऱाहील उभे चित्र समोरी
गळफास लावता जगेल कैसे
कुटुंब त्याचे या भूवरी ||
जनतेची पोटे भरता भरता
आबाळ होते शेतकऱ्याची
घरात नाही दाणा पाणी
आसवे भागवती तहान पाण्याची||
घाम गाळती शेतामध्ये
करता मशागत मातीची
प्रणाम माझा शेतकऱ्याला
करतो रक्षण मायभूमीची ||
करता पेरणी नांगरणी
तुटतो पाठीचा कणा
कांदा मिरची खातो भाकरी
असतो राहण्यात साधेपणा ||
नसे मित्र सखा सोबती
आपुलकी मात्र जपतो मनी
गांडूळ त्याचा मित्र शोभतो
आयुष्य देतो शेतीस अर्पूनी ||
कर्ज फेडता सरते जीवन
डोळ्यात पिकांची स्वप्न सोनेरी
भारतास लाभले हे भूषण
शिरपेच शोभे माथ्यावरी ||
