शेत करी ब्रम्ह
शेत करी ब्रम्ह
1 min
422
जगाचा पोशिंदा आहे शेतकरी
म्हणून आपण खातो पोटभरी
म्हणतो आपण अन्न हे पुर्ण ब्रम्ह
त्या आधी म्हणावं शेतकरी ब्रम्ह
समजा, नसती केली शेती बापाने
प्राण्यांना फस्त केले असते पोराने
शेती करुन जीवदान मिळते प्राण्यांना
जगा आणि जगु द्या प्राणीजीवांना
बाप शेतकरी आहे, म्हणून मी आहे
बाप शेतकरी नाही, तर मी पण नाही
बाप माझा शेतकरी, जगाचा सहारा
बाप माझा राबतो, शेतात करी पहारा
पुजा, पाठ करून नाही पीकतं शेती
मातीत घामाचं मुरतं पाणी, मगं दिसतं मोती
अवकाळी निसर्गाचा करतो सामना
श्रमाच्या देवाकडं मागतो मनोकामना
