शेकोटी...!
शेकोटी...!
1 min
721
तुझ्या मायेच्या पंखा खाली
आई ऊब ग मायेची मोठी
तरी पेटविली ग थंडीत
शेकोटी ग तुझ्यासाठी
शेकोटीची उब थोडी थोडी
काढते ग उगाच खोडी
चटके देऊन हातास
बोलावते ग तुझ्या मायेस
हसू गालात फुलते
मला पाहून हसतमुख
तुझ्या हास्यात ग वसते
माझ्या जन्माचे ग सुख....!