STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

4  

Shreyash Shingre

Others

शेकोटी

शेकोटी

1 min
249

हुडहुडी जेव्हा भरू लागते

शरदाच्या टिपूर चांदण्यांमध्ये

"शेकोटी" तेव्हा पेटू लागते

प्रत्येक घराच्या अंगणामध्ये


ऊब मिळावी थंडीमध्ये 

म्हणून दाटीवाटीने बसलो आम्ही

सुख-दुःख वाटून परस्परांशी

मत्सराला जाळले आम्ही


हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये

"शेकोटीची" फक्त साथ होती

स्वेटर , मफलर नावापुरते

तिची ऊब काही औरच होती


"शेकोटी" सारखा ज्वलंत निर्धार

प्रत्येकाने उरी बाळगला पाहिजे

स्वतः संपून गेलं तरीही

दुसऱ्यांच्या कामी आलं पाहिजे


नव्या उमेदीची, नवी शेकोटी

प्रत्येकाच्या मनी पेटायला हवी

'विझणार नाही' ध्येय गाठताना

ह्याची काळजी घ्यायला हवी



Rate this content
Log in