शब्दवेडा
शब्दवेडा
1 min
247
कवितेमध्येच असतो मग्न लोकं त्याला म्हणती वेडा
कोणी नाही सगे सोबती तो आहे जरा शब्दवेडा
वाचन हेच त्याचे काम कवितेतूनच मिळते दाम
सर्वाना सांगतो सुविचार कविता हेच त्यांचे नाम
कविता वाचायला सोपी पण रचायला असते अवघड
शब्दच वेळेवर सुचत नाही डोकं पडत जातंय जड
मनातील भावना व्यक्त करण्या कविता एक चांगले माध्यम आहे
कोणी वेडा म्हणो की खुळा कविता जगण्याचे साधन आहे
