STORYMIRROR

jaya munde

Others

3  

jaya munde

Others

शब्दसरी

शब्दसरी

1 min
147

  आयुष्याच्या ओंजळीतूनी

   शब्दसरी बरसल्या,

   जादूभरा शृंगार लेवून

   खुद्कन गाली हसल्या...


   मैफिलीत कविता होऊन

   लखलखत मनी वसल्या,

    सुख-दु:खाची साथ करत

   समाधानाची झालर ल्याल्या.


   शब्दसरींत चिंब-चिंब

   मनोमनी खुलून जाते,

   अंतराच्या आत्मानंदी

   पुन्हा एकदा सान होते...


    त्या अर्थाचा गंध घेऊनी

    श्वासातूनी सहज उरते,

     शब्दसखीची चाहूल मज

     सौख्यदायी क्षण सजवते..


     शब्दसरींना कवेत घेऊन

     मंद स्मृतींना उजळवते,

      सांजवेळी जीवनाच्या

      कुशीत घेण्या आतुरते..


     जन्मोजन्मी साथ लाभावी

     क्षणक्षण उमलत जावे,

     शब्दसरींच्या बेधुंदतेत

      आयुष्य जगत रहावे..


Rate this content
Log in