शब्दधन
शब्दधन


शब्दाने जो धनवान
तोच खरा प्रतिभावान
शब्दधन जयापाशी
तोच खरा भाग्यवान.....!!
शब्दची अमृतवेल
शब्दच असे धार
शब्दच गोडवा
जणू दुधारी तलवार...!!
शब्दधन खरी श्रीमंती
असे नित्य जयापाशी
शरद मायेचा ओलावा
मिळे आईच्या कुशी.....!!
शब्दांनी वाढतो गोडवा
शब्दची जणू तीर
शब्द अंतरीचे भाव
शब्द जादूची वकील.....!!
शब्द काळजाला भिडे
शब्द करी काळजात घर
शब्द शब्दच असती
नसे कधी वरवर......!!